July 14, 2024 7:05 PM July 14, 2024 7:05 PM

views 11

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त

मुंबई सीमा शुल्क विभागाच्या पथकानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ४ किलो २७ ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचा आणि १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. बँकॉकहून आलेल्या एका भारतीय नागरिकाकडे खाद्यपदार्थ आणि खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेला गांजा आढळल्यानंतर त्याला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.