June 18, 2024 8:05 PM June 18, 2024 8:05 PM

views 26

मिफमधे आज भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर मार्गदर्शनसत्र

१८वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफचा आजचा चौथ्या दिवसही विविध चित्रपटांचं प्रदर्शन, संबंधित विषयांवरची चर्चासत्रं आणि मार्गदर्शनसत्रं, तसंच परिसंवादांनी गाजला. भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर अल्फोन्स रॉय यांचं मार्गदर्शनसत्र  आज झालं. ॲनिमेशनपटांचा प्रवास आणि तरुण आणि मध्यमवयीनांना पडलेली ॲनिमेशनपटांची भुरळ यावर मुंजल श्रॉफ आणि केतन मेहता यांनी आपापले विचार मांडले. चरित्रात्मक माहितीपट आणि चरित्रपट यांच्यातला फरक राहुल रवैल आणि रॉबिन भट्ट यांनी उलगडून ...

June 15, 2024 9:22 AM June 15, 2024 9:22 AM

views 40

मिफ महोत्सवातले चित्रपट पहिल्यांदाच मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दाखवले जाणार

मिफ महोत्सवातले चित्रपट यंदा पहिल्यांदाच मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दाखवले जाणार आहे. यंदाच्या मिफमध्ये ५९ हून देशातल्या ६१ भाषांमधले १ हजारांहून अधिक चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. पहिल्यांदाच या महोत्सवासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं प्रवेशिका आल्या आहेत. त्यातल्या ३१४ चित्रपटांचा समावेश चित्रपट महोत्सवात झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीत २५ आणि राष्ट्रीय स्पर्धा श्रेणीत ७७ चित्रपट आहेत. अमृत काळातला भारत या विषयावरच्या चित्रपटांसाठी यंदाच्या मह...

June 14, 2024 7:36 PM June 14, 2024 7:36 PM

views 21

मिफमुळे देशातल्या कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळेल असं संजय जाजू यांचं प्रतिपादन

मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळं देशातल्या कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळेल. माहितीपट हा एक प्रचंड मोठा उद्योग आहे. माहितीपटांच्या माध्यमातून मनोरंजनासह स्वतःकडे आणि समाजाकडे पाहता येतं, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज केलं. या महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते मुंबईत बोलत होते. या महोत्सवामुळं कलेच्या प्रसारासोबतच समाजातले विविध मुद्दे सर्वांसमोर येतील आणि त्यावर पर्याय काढायला यामुळं मदत होईल, असंही ते म्हणाले. यंदाच्या...