February 3, 2025 11:21 AM February 3, 2025 11:21 AM

views 11

तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. आपण आपल्या भाषेवर ठाम राहीलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संमेलन प्रत्येक शहरामध्ये भरवलं गेलं पाहिजे, अशी शासनाकडे मागणी करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.