June 22, 2024 2:40 PM June 22, 2024 2:40 PM
20
आय एन एस सुनयना जहाजाचा मॉरिशसच्या पोर्ट लुईस इथं प्रवेश
हिंदी महासागराच्या नैऋत्य भागात तैनात असलेल्या आय एन एस सुनयना या जहाजानं मॉरिशसच्या पोर्ट लुईस इथं गुरुवारी प्रवेश केला. मॉरिशस विशेष आर्थिक क्षेत्रासह या भागात संयुक्त टेहळणी भारतीय नौदलाची सागरी सुरक्षेबाबत सामायिक कटिबद्धता अधोरेखित करते. जहाजाचं आगमन झाल्यावर मॉरिशस किनारपट्टी सुरक्षा विभागाच्या ताफ्यानं तसंच मॉरिशस पोलीस दलानं या जहाजाचं स्वागत केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पोर्ट लुईस इथं आय एन एस सुनयना आणि एम एन सी जी बाराकुडा या जहाजांवर योग सत्राचं आयोजनही करण्यात आलं होत...