August 16, 2025 11:34 AM August 16, 2025 11:34 AM
44
पुतीन आणि ट्रम्प यांच्यातील महत्त्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपन्न
रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलास्कामध्ये महत्त्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपली. अलास्कातील लष्करी तळावर जवळपास तीन तास झालेल्या चर्चेला मोठी प्रगती असं संबोधलं गेलं असलं तरीही या बैठकीत, युक्रेन रशिया संघर्षासंदर्भात तोडगा निघण्याची अपेक्षा फोल ठरली. बैठकीनंतर झालेल्या संयुक्त परिषदेला संबोधित करताना पुतीन यांनी चर्चेचा मुख्य मुद्दा युक्रेन संघर्ष असल्याचं सांगितलं. हा संघर्ष संपवण्यात रशियाला रस असल्याचं पुतीन म्हणाले. रशियाने...