October 26, 2024 6:18 PM October 26, 2024 6:18 PM

views 12

निवडणुकीत महिलांची मतं मिळवण्यासाठी लाडकी बहीणसारख्या योजना सरकारनं जाहीर केल्या-जयंत पाटील

निवडणुकीत महिलांची मतं मिळावीत म्हणून लाडकी बहीणसारख्या योजना सरकारनं जाहीर केल्या आहेत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत व्यक्त केलं. या सर्व योजनांचा उहापोह प्रचारात करणार असून आम्ही परिवर्तनासाठी आग्रही आहोत, असं ते पुढे म्हणाले. या सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही भरपाई दिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

July 9, 2024 3:41 PM July 9, 2024 3:41 PM

views 10

राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाला जनतेकडून देणगी स्वीकारता येणार

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून देणगी स्वीकारण्याची राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षानं केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या.