November 10, 2024 11:02 AM November 10, 2024 11:02 AM

views 13

मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम

नांदेड इथं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा काल श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, सर्व महिलांनी मतदान केलं पाहिजे, अशा आशयाचे संदेश या माध्यमातून देण्यात आले. त्याबरोबरच सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत मत...

November 9, 2024 2:28 PM November 9, 2024 2:28 PM

views 6

मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या विशेष अभियानाचा शुभारंभ

विधानसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा,अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत करण्यात आला. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचं लोकार्पण करण्यात आलं. याअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा...