June 18, 2025 2:27 PM June 18, 2025 2:27 PM

views 18

प्रधानमंत्री मोदी यांनी G7 नेत्यांसोबत प्रमुख जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर केली चर्चा

कॅनडामधील कनानास्किस इथं झालेल्या जी-सेव्हन संपर्क शिखर परिषदेच्या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-सेव्हन नेत्यांसोबत प्रमुख जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर चर्चा केली. बदलत्या जगात भविष्यातली ऊर्जा सुरक्षितता, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकीच्या जी-सेव्हन चर्चेत त्यांनी भाग घेतला. शाश्वत आणि हरित मार्गानं सर्वांसाठी ऊर्जा सुरक्षिततेची खात्री करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आणि या करता आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा परिषद आणि जागतिक जैव इंधन आ...

April 17, 2025 3:23 PM April 17, 2025 3:23 PM

views 10

प्रधानमंत्री मोदी यांनी माजी प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली श्रद्धांजली

माजी प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रशेखर यांचं राजकारण नेहमी देशाच्या हितासाठी होतं. सामाजिक सद्भावना आणि देशाच्या विकासातलं त्यांचं योगदान नेहमी स्मरणात राहील.

February 5, 2025 9:30 AM February 5, 2025 9:30 AM

views 8

प्रधानमंत्री मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला देणार भेट

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथ महकुंभ मेळयात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार असून, सकाळी 11 वाजता ते त्रिवेणी संगमावर पूजा आणि पवित्र स्नान करणार आहेत. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री अनेक साधू संतांची भेट घेणार आहेत. तसच महकुंभमेळा परिसराची पाहणीही करणार आहेत. मागील वर्षी 13 डिसेंबर 2024 ला प्रधानमंत्री मोदी यांनी प्रयागराज इथ येऊन सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांच्या 167 विकास प्रकल्पांच उद्घाटन केल होत. दरम्यान, 13 जानेवारीपास...

January 7, 2025 11:18 AM January 7, 2025 11:18 AM

views 7

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी घेतली प्रधानमंत्री मोदी यांची भेट

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गेल्या चार वर्षांतील भारत-अमेरिकेदरम्यानच्या जागतिक धोरणात्मक भागीदारीतील महत्त्वपूर्ण प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. विशेषत: तंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, नागरी आण्विक, स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि एआय या प्रमुख क्षेत्रांवर यावेळी भर देण्यात आला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या विविध भेटींचे स्मरण करून, पंतप्रधान मोदी यांनी भारत-अमेरिका व्यापक जागति...

December 4, 2024 9:25 AM December 4, 2024 9:25 AM

views 9

प्रधानमंत्री मोदी उद्या मुंबईत नवनिर्वाचित सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याला राहणार उपस्थित

प्रधानमंत्री मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. नवनिर्वाचित सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. उद्या सायंकाळी आझाद मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याच्या तयारीची महायुतीतल्या नेत्यांनी काल पाहणी केली. या सोहळ्याला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रित केलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, नागपूरच्या रामनगर इथं चहाचं दुकान चालवणारे गोपाल बावनकुळे यांना शपथग्रहण समारोहात उपस्थित राहण्याचं निमंत्रण फोन द्वारे मिळालं आहे. गोपाल बावनकुळे ह...

June 14, 2024 7:45 PM June 14, 2024 7:45 PM

views 9

प्रधानमंत्र्यांची इटलीमधे विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीमधे अपुलिया इथं आज विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. जी सेव्हन देशांच्या शिखर परिषदेसाठी मोदी सध्या इटलीत आहेत. आज दुपारी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, अंतराळ, शिक्षण, हवामान बदल, पायाभूत सुविधा, उर्जा, क्रीडा इत्यदी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्याविषयी त्यांची बातचीत झाली. जागतिक आणि क्षेत्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरही उभय नेत्यांमधे विचारांची देवाण घेवाण झाली. पुढच्या वर्षी फ्रान्समधे होणाऱ्या क...