June 20, 2025 10:05 AM June 20, 2025 10:05 AM

views 15

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचं केलं अभिनंदन

लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ अजिंक्यपदस्पर्धेत उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची खेळाडू असलेल्या हौ यिफान हिला पराभूत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचं अभिनंदन केलं आहे. दिव्याचं हे यश तिच्या धैर्य आणि दृढनिश्चयाला अधोरेखित करतं आणि ते अनेक भावी बुद्धिबळपटूंना देखील प्रेरणा देईल, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

June 20, 2025 9:12 AM June 20, 2025 9:12 AM

views 11

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या 5 हजार 9 शे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार राज्याच्या दौऱ्यावर असून, ते या दौऱ्यात 5 हजार 9 शे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये विविध नवीन रेल्वे गाड्यांचा शुभारंभ, प्रधानमंत्री घरकुल योजना, नमामी गंगे योजनेअंतर्गत 6 मैला शुद्धीकरण प्रकल्पांच उद्घाटन आदि विकासकामांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आज दुपारी बिहार मधल्या सिवन जिल्ह्यातल्या जसाउली इथं जाहीर सभा घेणार असून त्यानंतर दूरस्थ पद्धतीने त्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन आणि कोनशीला समारंभ होणार आहे. प्रध...

April 5, 2025 1:46 PM April 5, 2025 1:46 PM

views 7

प्रधानमंत्री मोदी यांनी माजी उपप्रधानमंत्री बाबू जगजीवन राम यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

माजी उपप्रधानमंत्री बाबू जगजीवनराम यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. वंचित आणि शोषितांच्या कल्याणासाठी बाबू जगजीवनराम यांनी दिलेला अविरत लढा प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर लिहीलेल्या संदेशात म्हटलं आहे.

April 5, 2025 9:50 AM April 5, 2025 9:50 AM

views 11

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर, द्वीपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल संध्याकाळी तीन दिवसीय श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथं पोहोचले. श्रीलंकेच्या उच्चस्तरीय मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी आज श्रीलंकेचे पंतप्रधान अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासाठी द्वीपक्षीय चर्चा करतील. भारताच्या शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या धोरणाचा श्रीलंका अविभाज्य भाग असून या भेटीत उर्जा, व्यापार, संपर्कजाळे, डिजीटलायझेशन आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये उभय देशांचे संबंध दृढ करण्याच्या हेतूने व्यापक चर्चा करतील. मोदी यांची श्रीलंकेला ही ...

February 11, 2025 1:41 PM February 11, 2025 1:41 PM

views 12

भारत ऊर्जा सप्ताहाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने उद्घाटन

देशाची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता ३२ पटीने तसंच जीवाश्मेतर इंधन निर्मिती क्षमता तिप्पट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. द्वारका इथं आजपासून सुरू झालेल्या भारत ऊर्जा सप्ताहाचं प्रधानमंत्र्यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. पॅरीस जी-२० कराराचं उद्दिष्ट साध्य करणारा भारत पहिला देश असल्याचंही ते म्हणाले. गेल्या दशकभरात भारताच्या अर्थव्यवस्थेने दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली असंही प्रधानमंत्री म्हणाले. जगभरातले देश भारताचा गौरव करत असल...

February 6, 2025 8:13 PM February 6, 2025 8:13 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी परीक्षा पे चर्चा मधून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजेच १० फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत. परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं या दृष्टीनं प्रधानमंत्री या कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात. नवी दिल्लीच्या भारत मंडपम् मधे होणाऱ्या या कार्यक्रमात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले प्रत्येकी ३६ विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. यंदा या कार्यक्रमाचे एकूण ८ भाग होणार असून उर्वरित भागात विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्ती त्यांचे अनुभव विद्यार्थ...

February 6, 2025 10:32 AM February 6, 2025 10:32 AM

views 11

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ईशान्य भारत आता विकासाच्या मार्गावर असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ईशान्य भारत आता विकासाच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते काल त्रिपुरा सरकारमधील 2800 हून अधिक नोकरीच्या नियुक्ती पत्रांच्या वितरण कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित करत होते. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं त्रिपुरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तीन करार केल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. त्रिपुरातील सशस्त्र गट संपुष्टात आले असून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. मोदी सरकारनं ब्रु-रिआंग लोकां...

February 5, 2025 4:18 PM February 5, 2025 4:18 PM

views 2

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीतून संगमावर फेरी मारली. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर त्रिवेणी संगमावरचं स्नान ही दैवी अनुभूती असून त्यावेळी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या कोट्यवधी भाविकांप्रमाणे आपलं मनही भक्तिमय झालं होतं, अशा भावना प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर व्यक्त केल्या. जीवनदायिनी गंगा देशवासियांना शांती, सद्बुद्धी,...

January 15, 2025 10:20 AM January 15, 2025 10:20 AM

views 9

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी विक्रमी नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यावेळी विक्रमी सव्वा तीन कोटी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. यात परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती शालेय स्तरावर 12 जानेवारीपासून सुरू झाली असून, ती 23 जानेवारी रोजी संपेल. पंतप्रधान मोदींच्या 'परीक्षा पे चर्चा' या अनोख्या उपक्रमाचा उद्देश परीक्षेशी संबंधित ताण कमी करणे हा आहे. या कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्री विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि आत...

December 12, 2024 10:40 AM December 12, 2024 10:40 AM

views 8

बहुपैलू चित्रकर्मी राजकपूर यांच्या कुटुंबीयांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

बहुपैलू चित्रकर्मी राजकपूर यांच्या कुटुंबीयांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज कपूर यांची जन्मशताब्दी चौदा डिसेंबरला आहे. त्या निमित्तानं चाळीस शहरांमध्ये तेरा ते पंधरा डिसेंबर या काळात राज कपूर चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधानांना आमंत्रण दिलं. राज कपूर यांनी जगाला भारताचं महत्त्व दाखवून दिलं असं पंतप्रधानांनी या प्रसंगी सांगितलं. राज कपूर यांचा करिष्मा मध्य आशियात अजूनही कायम असून, त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवावा असं...