भारत आणि इंग्लड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेत याआधी झालेल्या तीन सामन्यांपैकी भारतानं दोन तर इंग्लंडनं एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा, तर बरोबरी साधण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.
या मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना येत्या २ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे.