भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कोलकात्यात ईडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडच्या १४ व्या षटकात ६ बाद ९७ धावा झाल्या होत्या.
सामन्यातल्या तिसऱ्याच चेंडूवर अर्शदीप सिंगनं फिल सॉल्टला शून्यावर तंबूत धाडलं. तर तिसऱ्या षटकात त्यानं बेन डकेटला ४ धावांवर बाद केलं. त्यानंतर कर्णधार जोस बटलरनं इंग्लंडचा डाव सावरला.
भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.