महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत न्यूझिलंडने श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय मिळवला. जॉर्जिया प्लिमरचं अर्धशतक आणि ऍमेलिया केर हिच्या नाबाद ३४ धावांच्या बळावर न्यूझिलंडने अठराव्या शतकात श्रीलंकेचं ११६ धावांचं आव्हान पार केलं.
त्याआधी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ५ गड्यांच्या मोबदल्यात ११५ धावा केल्या. श्रीलंकेकडून चमारी अटापट्टी हिच्या ३५ धावांचा अपवाद वगळता कोणत्याही फलंदाजाला विशेष खेळी करता आली नाही. न्यूझिलंडच्या लेई कॅस्पेरेक आणि ऍमेलिया केर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.