सिरियामध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्कस ताब्यात घेतल्याचा दावा केला असून त्यांना सरकारी सशस्त्र दलांकडून कुठलाही विरोध झाला नसल्याचं म्हटलं आहे. या दरम्यान राष्ट्राध्यक्ष बशर अल असद दमास्कस सोडून अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार बंडखोरानी आज पहाटे दमास्कसमध्ये प्रवेश केला. यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेत लेबनाननं बैरुतला दमास्कसशी जोडणाऱ्या सीमेव्यतीरिक्त इतर सीमा बंद केल्याचं जाहीर केलं आहे. जॉर्डननं देखील सिरियालगतच्या आपल्या सीमा बंद केल्या आहेत.
Site Admin | December 8, 2024 2:31 PM | Bashar al-Assad | Damascus | Syrian President