अमेरिकेनं सीरियावर लादलेले निर्बंध उठवण्याची विनंती सीरियाचे परराष्ट्र मंत्री असद हसन अल-शिबानी यांनी केली आहे. सिरीयातील सामान्य नागरिकांचं जीवनमान पुर्वपदावर आणण्यासाठी हे निर्बंध शिथील कारावेत असं कतारच्या राजनैतिक भेटीदरम्यान ते म्हणाले. कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांची त्यांनी काल भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. माजी अध्यक्ष बशर अल-असाद यांना बंडखोरीतून पायउतार व्हावं लागलं होतं मात्र त्यानंतर आता सीरियाचे अधिकारी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असद हसन अल-शिबाली या आठवड्यात संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डनला भेट देण्याची शक्यता आहे. अशी माहिती X माध्यमातून त्यांनी दिली आहे.
Site Admin | January 6, 2025 1:25 PM | Syria | US