डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 17, 2024 8:48 PM | Syria

printer

सीरियामधे गेल्या काही दिवसात झालेल्या हिंसाचारात ८ लाख ८० हजारांपेक्षा जास्त लोक विस्थापित

सीरियामधे गेल्या काही दिवसात झालेल्या हिंसाचारात ८ लाख ८० हजारांपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयाने ही माहिती दिली. सुमारे ४० हजार विस्थापितांनी सीरियाच्या ईशान्य भागातल्या अडीचशे शिबिरांमधे आश्रय घेतला आहे. लेबनॉन – सीरिया सरहद्दीवर मोठ्या संख्येने विस्थापितांची ये-जा सुरु असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. सुमारे ६ टक्के  विस्थापितांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचं अपंगत्व आलं आहे. या विस्थापितांना मानवतेच्या दृष्टीनं अन्न, पाणी, रोख पैसा,तंबू, आणि ब्लँकेट्स या स्वरुपातली मदत देण्यात येत आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा