सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन या भारताचे अव्वल खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पी.व्ही. सिंधूने उपान्त्य फेरीत उन्नती हुडा हिला अवघ्या ३५ मिनिटांत २१- १२, २१ – ९ असं हरवलं. अंतिम फेरीत तिची लढत थायलँडच्या लालि नरत चायवान या चीन की लुओ यू वू हिच्याशी होणार आहे.
पुरुष गटाच्या उपान्त्य फेरीत लक्ष्य सेन ने जपानच्या शोगो ओगावा याचा २१ -८ आणि २१ – १४ अशा गुणफरकाने पराभव केला. अंतिम फेरीत आता त्याचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याबरोबर होणार आहे. तेहने उपान्त्य फेरीत भारताच्या प्रियांशु राजावतला हरवलं.
ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही जोडी त्यांनी थायलंडच्या बेनियपा एमसार्ड आणि नुन्ताकाम एमसार्ड जोडीला हरवून महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.
मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांनी चीनच्या झोऊ झी होंग आणि यांग जिया यी जोडीवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.