डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीचा सामना चीन सोबत

स्वित्झर्लंडमध्ये बासेल इथं सुरु असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या शेंग शु लिऊ आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सामना सुरु होईल.

 

काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रीसा आणि गायत्री यांनी हाँगकाँग चीनची आठवी मानांकित जोडी, येउंग नगा टिंग आणि येउंग पुई लाम यांचा पराभव केला होता.

 

दरम्यान, पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या शंकर सुब्रमण्यमला फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्हकडून पराभव पत्करावा लागला. भारताचे इतर सर्व खेळाडू स्पर्धेबाहेर पडले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा