डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात

देशभरात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२४’ ला सुरुवात झाली. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू असेल. स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता ही यंदाच्या अभियानाची संकल्पना आहे. यंदाच्या अभियानासाठी संपूर्ण समाजाचा सहभाग असावा या दृष्टीने श्रमदान मोहिमा, जन भागिदारी आणि सफाई मित्र हे तीन प्रमुख स्तंभ म्हणून निश्चित केले गेले आहेत. या अभियाना अंतर्गत पर्यटनस्थळं, सार्वजनिक इमारती, व्यापारी क्षेत्र, पाणवठे, प्राणिसंग्रहालयं, अभयारण्ये, सामुदायिक आणि सार्वजनिक स्वच्छतागृह अशा विविध ठिकाणी स्वच्छताविषयक श्रमदान आणि सामूहिक मोहिमा राबवल्या जाणार आहेत. 

या अभियानाच्या निमित्तानं आज ठिकठिकाणी स्वच्छताविषयक शपथ ग्रहण कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. याअंतर्गत राज्यात विविध रेल्वे स्थानकं, आकाशवाणीची मुंबईसह इतर प्रादेशिक केंद्र, तसंच केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध कार्यालयांमध्ये स्वच्छताविषयक शपथ दिली गेली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा