देशभरात उद्यापासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहाणार आहे. ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे.
या अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान आणि सामूहिक कार्याच्या माध्यमातून पर्यटन स्थळं, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक परिसर, जलाशय, प्राणीसंग्रहालय, अभयारण्य आणि सार्वजनिक स्वच्छतागृह सारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहेत. सर्व केंद्रीय तसच राज्य मंत्रालयं लोकसहभागातून विविध योजना राबवणार आहेत.
संपूर्ण समाजाचा विचार करण्याचा दृष्टीकोन बाळगून स्वच्छता लक्ष्य विभाग, श्रमदान उपक्रम-स्वच्छतेमध्ये लोकसहभाग आणि स्वच्छतामित्र सुरक्षा शिबिर हे तीन घटक या मोहिमेचे प्रमुख आधारस्तंभ असतील. या अभियानात देशभरातले नागरिक, उद्योग, स्वयंसेवी संस्था, विकास संस्था यांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थाना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.