स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेत ऑरलँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. राझीलच्या या जोडीनं फ्रान्सच्या ग्रेगोयर जॅक आणि मॅन्युअल गुइनार्ड या जोडीचा ७-५, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी राफेल नादाल आणि पोर्तुगालचा नुनो बोर्जेस यांच्यात अंतिम लढत सुरू आहे. या सामन्यात बोर्जेस यानं पहिला सेट ६-३ असा जिंकून नादालवर बढत मिळवली आहे.