स्वीप या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोच्या चित्ररथाला आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
नंदुरबारमध्येही केंद्रीय संचार ब्युरो आणि निवडणूक आयोगामार्फत पाठवण्यात आलेल्या मतदान प्रचार रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते झाला. धाराशिव इथं देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मतदार जनजागृती यात्रेचा आरंभ आज झाला.