श्रीलंकेविरुद्ध आगामी वीस षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या महिन्याच्या 27 तारखेपासून ही मालिका सुरू होत आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या 50 षटकांच्या मालिकेसाठी याच संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही मालिकांमध्ये शुभमन गील संघाचा उपकर्णधार असेल. 20 षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे , अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, खालील अहमद आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे.