भारत-नेपाळ दरम्यानच्या 18 वा सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावाला आजपासून नेपाळमध्ये प्रारंभ होत आहे. या सरावात जगंलातले युद्ध, तसंच कठीण भूप्रदेशात दहशतवादाचा प्रतिकार तसंच आपत्ती व्यवस्थापनात मानवतावादी मदत यावर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. भारतीय लष्कराची 11 वी गोरखा रायफल तुकडी आणि नेपाळ लष्करातली श्री जंग बटालियन यांच्यादरम्यान दोन आठवड्यांच्या सरावात सहभागी होणार आहेत. या सरावामुळे, उभय देशांतील व्यावसायिक सहकार्य, मैत्रीपूर्ण संबंध आणि विश्वास तसंच सांस्कृतिक संबंधांचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे.
Site Admin | December 31, 2024 11:05 AM
सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावाला आजपासून नेपाळमध्ये प्रारंभ
