शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचं, आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक मोजमाप होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळू शकेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले. ‘‘फसल खराब हुई तो सॅटेलाईट के आधार पर रिमोट सेन्सिंग से इमेज लेंगे। फसल के नुकसान का आकलन करेंगे। और वो आकलन परफेक्ट होगा और जितना नुकसान होगा फसल का, फसल का उत्पादन कम होगा, उसका आकडा होगा सीधा किसान के अकाऊंट मे डीबीटी के माध्यम से डाल दिया जायेगा।’’
Site Admin | January 4, 2025 11:43 AM | Agriculture Minister's information | Satellite | Survey of agriculture | Union