छत्तीसगढमध्ये नारायणपूर जिल्ह्यात २९ माओवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं. पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. वेगवेगळ्या प्रकरणात आरोपी असलेल्या या माओवाद्यांमध्ये सात महिलांचा समावेश आहे. छत्तीसगढ सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार आत्मसमर्पण केलेल्या या माओवाद्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत देण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक प्रभात कुमार यांनी दिली.
Site Admin | January 30, 2025 5:37 PM
छत्तीसगढमध्ये नारायणपूर जिल्ह्यातल्या २९ माओवाद्यांचं आत्मसमर्पण
