आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे सेवानिवृत्त निवेदक सुरेश भावे यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या देहदानाच्या इच्छेनुसार त्यांचं पार्थिव आज रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आलं. १९७७ पासून २००६ पर्यंत ते आकाशवाणीच्या सेवेत होते. रंगभूमीवर त्यांचं योगदान होतं. तसंच कीर्तनकार म्हणूनही त्यांनी नावलौकिक प्राप्त केला होता.
Site Admin | January 27, 2025 12:41 PM | Passed Away | Suresh Bhave
आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे सेवानिवृत्त निवेदक सुरेश भावे यांचं निधन
