डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 9, 2024 8:21 PM | Supreme Court

printer

नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ही परीक्षा येत्या रविवारी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेकरता अनेक उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूरवरची किंवा अतिशय गैरसोयीची केंद्र मिळाली असल्याचं याचिकेत म्हटलं होतं. परंतु, या कारणासाठी सुमारे दोन लाख परीक्षार्थींचं भविष्य पणाला लावता येणार नाही, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठाने स्पष्ट केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा