दिल्लीच्या शंभू सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधी नवी याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यासंबंधात न्यायालयात आधीच याचिका प्रलंबित असल्याने त्याच मुद्द्यावर नवी याचिका न्यायालय स्वीकारणार नाही असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने आज नमूद केलं आहे.
आंदोलनासाठी महामार्गांवर अडथळे आणणे हा राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार गुन्हा आहे आणि म्हणून न्यायालयाने आंदोलनकर्त्यांना हटवण्याचे आदेश द्यावेत यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती.
Site Admin | December 9, 2024 4:53 PM | dellhi | shambhu seema