नीट युजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं हवीत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. नीट युजी परीक्षेत गैरप्रकार झाल्यापरकरणी दाखल ४० याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर सादर केला. तो आताच जाहीर केला तर पुढच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. अशा प्रकारच्या परीक्षेत गैरप्रकार घडण्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम होतात अशा शब्दात न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी पारडीवाला, आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर आज दिवसभर सुनावणी चालणार आहे. दरम्यान, नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने पाटणा एम्समधल्या ४ विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
Site Admin | July 18, 2024 3:03 PM | NEET-UG examination | Supreme Court