निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यावर तिनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणी घेतली, आणि तिच्याविरुद्ध कठोर पावलं उचलू नयेत, असे आदेश दिले.