डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कोलकात्याच्या राधागोविंद कार रुग्णालयातल्या डॉक्टरांनी संप मागे घ्यावा अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना

कोलकात्याच्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा  ताजा अहवाल पुढच्या मंगळवारपर्यंत सादर करावा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज सीबीआयला दिल्या. सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणी स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे बी पारडीवाला आणि  मनोज मिश्र यांच्या खंडपीठासमोर होत आहे.

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे असून त्यांनी फॉरेन्सिक अहवालाची तपासणी केल्यानंतर गोळा केलेले नमुने न्यायालयात सादर केले होते. एम्स आणि इतर केंद्रीय प्रयोगशाळांमध्ये तपासलेले फॉरेन्सिक नमुने सादर केले जातील, असं सीबीआयनं यावेळी सांगितलं.

सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता तर पश्चिम बंगाल सरकारकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. दरम्यान, निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप मागे घेऊन उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कामावर हजर व्हावं असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. या संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करु नये, तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, अशी सूचना ही सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा