डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नीट-यूजी परीक्षेचा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश

नीट युजी २०२४ परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल,उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला दिले आहेत. नीट युजी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात दाखल झालेल्या ४० याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर कालपासून सुरु झाली, त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले.

 

एनटीएने शहर आणि परीक्षा केंद्राच्या तपशिलासह, परीक्षार्थींची ओळख कोणत्याही प्रकारे न दडवता आपल्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करावा असे न्यायालयाने म्हटले आहे. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभाग – सीबीआयनं आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल काल बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर सादर केला. तो आताच जाहीर केला तर पुढच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अशा परीक्षेतल्या गैरप्रकारांचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम होतात अशा शब्दात न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. पुढची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.

 

दरम्यान, नीट यूजी पेपर फुटीप्रकरणी सीबाआयनं बिहारची राजधानी पाटणा इथल्या एम्स महाविद्यालयातल्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरु आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा