निवडणूक नियमात सरकारने केलेल्या दुरुस्तीला आव्हान देणारी याचिका काँग्रेसने आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. केंद्रसरकारने निवडणूकींशी संबधित इलेक्ट्रॉनिक दस्तवेज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यायला मनाई करणारी सुधारणा निवडणूक नियम १९६१ मध्ये केली आहे. आयोगाच्या शिफारसीवरुन ही सुधारणा केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. ही सुधारणा एकतर्फी आणि चर्चेविना केल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
Site Admin | December 24, 2024 6:41 PM | Congress | Supreme Court