दिल्लीतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी तसंच निवासी डॉक्टर्सच्या संघटनेनं संप मागे घेतला असल्याची घोषणा केली आहे. यात, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, सफदरजंग रुग्णालय आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजसह दिल्लीतील केंद्रसरकारच्या रुग्णालयांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संघटेनेनं संप मागे घेत असल्याचं सांगितलं आहे. कोलकातामधील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात घडलेल्या घटनेची गंभीर दखल तसंच देशभरातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या समस्येकडे लक्ष पुरवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत या समस्यांचं त्वरित आणि निराकरण होण्यासाठी राष्ट्रीय कृती दल स्थापन करण्याच्या आदेशाबद्दलही संघटनेनं समाधान व्यक्त केलं आहे.
Site Admin | August 23, 2024 10:12 AM | Supreme Court