वृक्षतोड हा मानवाच्या हत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीररित्या वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीला तोडलेल्या प्रत्येक झाडामागे न्यायालयानं एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या पीठानं हा दंड ठोठावला आहे. एका व्यक्तीनं संरक्षित हरित क्षेत्रातल्या ‘‘ताज ट्रेपेज़ियम झोन’ मधली सुमारे ४५४ झाडं कापली होती, त्यानं दाखल केलेली याचिका न्यायालयानं रद्दबातल केली आहे. २०१९ मध्ये न्यायालयानं ताज ट्रेपेज़ियम झोन मधल्या हरित क्षेत्रा बाहेरच्या खाजगी जमिनीवरची झाडं कापायला परवानगी दिली होती तो आदेश देखील सर्वोच्च न्यायालयानं मागे घेतला आहे.
Site Admin | March 26, 2025 3:47 PM | Supreme Court
‘वृक्षतोड’ हा मानवाच्या हत्येपेक्षाही मोठा गुन्हा – सर्वोच्च न्यायालय
