डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 19, 2025 3:37 PM | Supreme Court

printer

माध्यमांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी खबरदारी घ्यावी – सर्वोच्च न्यायालय

माध्यमांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी कोणतंही विधान, बातम्या किंवा मतं प्रकाशित करण्यापूर्वी खबरदारी घ्यायला हवी, असं सर्वोच्च न्यायालयाने बजावलं आहे. बिड अँड हॅमर या कंपनीमार्फत लिलाव करण्यात येणाऱ्या काही चित्रांच्या सत्यतेवर बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचा आरोप एका इंग्रजी दैनिकावर करण्यात आला होता. या दैनिकाचे संपादक तसंच इतर पत्रकारांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. जनमत घडवण्यात माध्यमं निर्णायक भूमिका बजावतात, त्यामुळे बातम्या जबाबदारीने देणं आवश्यक आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा सर्वोपरि अधिकार नाही, हे न्यायालयाने यावेळी अधोरेखित केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा