वंचित समुदायाच्या सक्षमीकरणात आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यात कायद्याची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. वंचित समुदायाचं सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाच्या दिशेनं पाऊल’ या विषयावर चंदीगड इथल्या न्यायिक अकादमीत आयोजित, राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या क्षेत्रीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत ‘पीडितांची काळजी आणि मदत प्रणालीची योजना’ अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली. या प्रणालीमुळे गुन्ह्यातील पीडितांची सर्वसामावेशक काळजी घेण्यास मदत मिळणार आहे.
Site Admin | November 17, 2024 8:01 PM | Supreme Court