आरोग्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असून कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार आहे, असं न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज यांच्या द्विसदस्यीय पीठाने आज झालेल्या सुनावणीत म्हटलं. तसंच दिवाळीच्या काळात दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणण्यात अपयश का आलं अशी विचारणा प्रशासनाला करत फटाक्यांवर बंदी आणण्याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
Site Admin | November 11, 2024 8:23 PM | Supreme Court