डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढवण्यासाठी पाठिंबा – शरद पवार

महाराष्ट्रात आरक्षणासंबंधाने दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर तोडगा काढावा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातलं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्वपक्षीय बैठक बोलावून तोडगा काढण्याविषयी सुचवलं, असं पवार म्हणाले. राज्यात सौहार्द निर्माण करण्यासाठी या बैठकीत एकमताने जो निर्णय होईल तो आपल्याला मान्य असेल असंही पवार यांनी सांगितलं. 

 

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढवता येणार नाही हा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व पक्षांनी मतभेद विसरून केंद्र सरकारकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करावी, आरक्षणाची मर्यादा वाढवल्यास आपल्या पक्षाचा याला पाठिंबा असेल असं, असंही पवार म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा