डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ, गोंधळातच पुरवणी मागण्या मंजूर

विधिमंडळ अधिवेशनात आजच्या दिवशी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या घोषणाबाजीतच दोन्ही सभागृहांमध्ये पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्न करूनही शांतता प्रस्थापित न झाल्यानं विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानसभेत काही विधेयकं मंजूर झाली. त्यानंतर विधानसभेचं कामकाजही दिवसभरासाठी थांबवण्यात आलं.

मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं का, यावर विरोधी पक्षानं भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत केली. सत्ताधारी आक्रमक राहिल्यानं आधी ५ आणि नंतर १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब झालं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही सत्ताधारी सदस्यांचा गदारोळ कायम राहिला. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना बोलू द्या असं आवाहन, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं. मात्र सत्तारूढ सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज पुन्हा ४५ मिनिटांसाठी तहकूब केलं.

विधानपरिषदेतही असंच चित्र राहिलं. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक गैरहजर राहिल्याचा मुद्दा प्रवीण दरेकर यांनी मांडला. त्यावर दोन्ही बाजूंच्या आमदारांनी हौद्यात उतरून प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी केली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्न करूनही गदारोळ चालूच राहिला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा