डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीच्या दिशेने

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीच्या दिशेनं यायला निघाले आहेत. एकूण चार अंतराळवीरांना घेऊन येणारं ड्रॅगन हे यान आज सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं झालं. ताशी सुमारे २७ हजार किलोमीटर वेगानं ते पृथ्वीच्या वायूमंडळात प्रवेश करेल.

 

पृथ्वीपासून १८ हजार फूट उंचीवर आल्यावर दोन ड्रॅगन पॅराशूट उघडली जातील तर सहा हजार फुटांवर मुख्य पॅराशूट उघडली जातील. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या पहाटे साडे तीनच्या सुमारास अंतराळवीर समुद्रात उतरण्याची अपेक्षा आहे. 

 

पृथ्वीवर सुरक्षित परतल्यावर भारताला भेट देण्याचं आमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना पत्राद्वारे दिलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा