भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी निक हेग एनआयसीआर दुर्बिणीच्या दुरुस्तीसाठी अंतराळ स्थानकातून बाहेर पडून वावरणार आहेत. न्यूट्रॉन ताऱ्यांच्या अंतर्भागाचं निरीक्षण करण्यासाठी बनवलेल्या या दुर्बिणीच्या संरक्षक कवचातून सूर्यप्रकाश झिरपल्यामुळे नोंदींमधे बिघाड झाल्याचं दिसून येत आहे.
त्याची दुरुस्ती हे दोघे येत्या १६ जानेवारीला करणार आहेत. दरम्यान अंतराळात अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अमेरिकन अंतराळवीर येत्या मार्चपर्यंत तरी पृथ्वीवर परतणार नाहीत, असं नासाने जाहीर केलं आहे.