स्विडीश ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सुमित नागलचा सामना आज अर्जेंटिनाच्या मरियानो नवोने याच्याशी होणार आहे.स्विडनच्या बस्ताद टेनिस स्टेडियमच्या सेंटर कोर्टमध्ये आज दुपारी हा सामना होईल. त्याआधी मंगळवारी झालेल्या सामन्यात सुमित नागलने स्विडनच्या एलियास यमेर याला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.