गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्या भारतीय प्रशासन सेवेच्या १९८७ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. राज्याच्या मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्या जून २०२५ पर्यंत या पदावर कार्यरत राहतील.
Site Admin | June 30, 2024 7:25 PM | Sujata Saunik