स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते. ऊसापासून साखर तर त्याच्या कचऱ्यापासून इथेनॉल मिळत असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढवण्याबाबत संशोधन करण्याचं आवाहन जोशी यांनी उपस्थित तज्ञांना केलं.
Site Admin | June 25, 2024 3:17 PM | ISO Council Meeting | New Delhi | Pralhad Joshi