वेतनवाढी सह अन्य मागण्यांसाठी राज्यातील दीड लाख साखर कामगारांनी नियोजित संप दोन महिन्यांसाठी स्थगित केला आहे. या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र राज्य सरकारने वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समितीची स्थापना केली. त्यामुळं हा संप दोन महिन्यांसाठी स्थगित केल्याचं साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी सांगितलं. साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तीन घटकांच्या प्रतिनिधींची- त्रिपक्षीय समिती स्थापन केल्याचं काळे म्हणाले.
Site Admin | December 13, 2024 7:42 PM | Sugar Workers