डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यातला साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात

राज्यातला साखर हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे ६१ लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून, १४ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. सर्वाधिक १७ लाख टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झालं; तर पुणे विभागात १४ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली. यंदा राज्यात ८५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र यंदा गाळप हंगाम नेहमीपेक्षा उशिरा सुरू झाला; त्यातच अतिवृष्टीमुळे राज्यात उसाला तुरे येण्याचं प्रमाणही वाढलं होतं; अशा विविध कारणामुळे साखर उत्पादन अंदाजापेक्षा कमी होईल, तसंच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर गाळप हंगाम लवकर संपेल, असं साखर आयुक्तालयानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा