देशात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही आज सरकारनं दिली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जीवनावश्यक वस्तूंच्या दराचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. रब्बी हंगामात १८ जून २०२४ पर्यंत २६६ लाख मेट्रिक टन तर २०२३मध्ये २६२ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. गव्हाच्या दरावर बारकाईनं लक्ष्य देऊन देशातल्या ग्राहकांसाठी स्थिर दराची ग्वाही मिळावी यासाठी योग्य तो धोरणात्मक हस्तक्षेप करावा असा सल्लाही सरकारनं यावेळी दिला आहे.
Site Admin | June 20, 2024 8:34 PM | Home Ministry | Wheat Stock