सुदानच्या दारफूर इथं RSF नं काल केलेल्या हल्ल्यात किमान ३२ नागरिक ठार झाल्याचा दावा सुदानच्या लष्करानं केला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि दहा मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यात १७ नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. आरएसएफनं आत्मघाती ड्रोन हल्ला केला तसंच अनेक ठिकाणी गोळीबारही केल्याची माहिती सुदान लष्करानं केला.
अल फशारमध्ये सुदान लष्कर आणि आरएसएफ मध्ये २०२४ पासून संघर्ष सुरू असून त्यात आतापर्यंत २९ हजार ६८३ नागरिकांचा जीव गेला आहे. यामुळे दीड लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत.