डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा होमी भाभा शिक्षण केंद्रात आज गौरव करण्यात आला. या स्पर्धेत मुंबईतला रुशील माथूर, पुण्याचा आदित्य मेंगुडी वेंकटगणेश, गुवाहाटीचा आनंदा भादुरी, नोएडाचा कणव तलवार यांनी सुवर्णपदकं,  दिल्लीच्या अर्जुन गुप्ताने  रौप्यपदक तर  पुण्याच्या सिद्धार्थ चोपरा याने उत्तेजनार्थ पदक  पटकावलं आहे. भारतीय चमूची आजवरची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा